Mufti Salman Azhari maharashtra marathi news Offensive speech in Gujarat Muslim cleric Azhari given two day transit remand

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mufti Salman Azhari : गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लीम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींना ( (Mufti Salman Azhari) रविवारी गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) घाटकोपरमधून अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलीस मुफ्ती सलमानला घेऊन मध्यरात्रीच गुजरातला रवाना झाले. तसेच त्यांना दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड देण्यात आली असल्याची माहिती वकील आरिफ सिद्धिकी यांनी दिली आहे, तसेच मुंबई पोलीस अजहरींना गुजरात बॉर्डर पर्यंत सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजहरींचे आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल

जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना मुंबईतून अटक केली.   या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केली आहे.

 

 

 

समर्थकांचा राडा, पोलीस अॅक्शन मोडमध्ये

ANI च्या वृत्तानुसार, इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केल्यानंतर रविवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर अजहरीच्या समर्थकांचा मोठा जमाव जमल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरु होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली.घाटकोपरचा एलबीएस मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा असून तो मुफ्ती यांच्या समर्थकांनी सकाळपासून रोखून धरला होता. समर्थकांच्या मोठ्या जमावानंतर, त्यांनी बराच वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला. 

 

हे ही वाचा>>

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts