India Can Win WTC Final 2023 In Day 4, know the planning of Rohit Sharma ; फक्त ३० षटकांमध्ये भारत WTC Final मध्ये मिळवू शकतो विजय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सार्लंडन : विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचे पहिले दोन्ही दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवले. पण सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय खेळाडूंच्या नावावर राहीला. त्यामुळे पहिल्या दोन्ही दिवशी ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण आता तिसऱ्या दिवशी मात्र भारताला विजयाची आशा दिसत आहे. पण त्यासाठी या सामन्याचा चौथा दिवस महत्वाचा आहे. पण भारताने फक्त एकच गोष्ट केली तर भारताचा विजय निश्चित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.तिसरा दिवस हा भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजा दोघांनीही गाजवला. फलंदाजीमध्ये अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यामुळे भारताला फॉलोऑन टाळता आला. अजिंक्यचे शतक यावेळी फक्त ११ धावांनी हुकले. दुसरीकडे शार्दुलनेही ५१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळता आली आणि त्यांना पहिल्या डावात २९६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर चांगलाच अंकुश ठेवला. डेव्हिड वॉर्नरला त्याला एका धावेवर बाद केले. उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड हे जास्त धावा करू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांची आशा आता मार्नस लाबुशेनवर असेल.

भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्यासाठी पहिल्या सत्रातील ३० षटकं महत्वाची ठरतील. या ३० षटकांत भारतीय संघाने जर ३ विकेट्स मिळवल्या तर हा सामना भारताच्या बाजूने झुकू शकतो. कारण आता भारतासाठी मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांच्या विकेट्स महत्वाचा असतील. या तिघांना जर भारताच्या संगाने ५० धावांच्या आतमध्येच गुंडाळले तर त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. पण त्यासाठी भारताची गोलंदाजी चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे फक्त पहिल्या सत्रातील गोलंदाजीच्या जोरावर भारत हा सामना जिंकू शकतो.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

आतापर्यंत या सामन्याच्या पहिल्या सत्रात ३० पेक्षा कमी षटके टाकली गेली असली आहेत. पण चौथ्या दिवशी तीन दिवसांचा कोटा भरून काढण्यासाठी ३० षटके टाकली जाऊ शकतात.

[ad_2]

Related posts