Pune news Hindu organizations united with the BJP in protest against the oppression of underage students Naushad Shaikh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन  (Pune Crime news) विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या आहेत. त्याची क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेवर आम्ही बुलडोझर चालवू असा इशाराच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. नौशाद शेखने 2014 साली असंच कृत्य केलं होतं. तेंव्हाचं त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्याचं धाडस वाढत चाललंय. त्याची ही वृत्ती ठेचण्याची गरज आहे. त्यामुळं त्याचं वकीलपत्र कोणीच घेऊ नये, असं आवाहन भाजपच्या आमदार उमा खापरेंनी केलंय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नौशाद शेखची मानसिकता ठेचावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. 

 

नेमकं काय आहे प्रकरण?

2 फेब्रुवारीला क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी नौशाद याला अटक करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवतो. 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख 26 हजार रुपये मोजले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहायचा. पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. 2022 मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला प्रतिकार केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली. 

2 वर्षे अत्याचारअन् धमकी

तुझे येथील मुलांसोबत संबंध असल्याचे तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी शेख याने त्या अल्पवयीन मुलीला दिली. त्याने धमकावून वारंवार मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या सुट्टीतही अत्याचाराचा प्रयत्न केला. अकॅडमीतील 12 वीच्या मुलीच्या समोरही अश्लील शेरेबाजी केली. याच अॅकेडमीतीली एका माजी विद्यार्थीनीनेही पीडितेला शेख याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटलेय.  नोव्हेंबर 2022 मध्ये शेख याने पीडितेला फ्लॅटवर बोलवून अत्याचार केला होता. घाबरलेली मुलगी निवासी शाळेत राहण्यास तयार नव्हती. आई वडिलांनी तिला गावाकडे नेले, 11 जानेवारी 2024 रोजी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसांग कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत शेख याला बेड्या ठोकल्या. 

10 वर्षांपूर्वीही झाली होती अटक 

लैंगिक अत्याचारप्रकरणी नौशाद शेख याला याआधीही अटक झाली होती. 10 वर्षांपूर्वी पोलिसांनी त्याला बेठ्या ठोकल्या होत्या. शेखविरोधातील अॅकॅडमीतील एका विद्यार्थीनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लौंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यावेळी शेख फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी शेख याला बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा शेख याला अटक कऱण्यात आली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune News : ललिल कला केंद्र नाटक प्रकरण; सत्यशोधक समितीतील नावं समविचारी; चौकशी समितीला अजित पवार गटाचा विरोध

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts