Anganwadi Workers will get pension and gratuity up to Rs 1 75 lakh maharashtra cabinet state govt ready to take big decision marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Workers) राज्य सरकार मोठी खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, त्याचसोबत ग्रॅज्युएटीही दिली जाणार असल्याचं समजतंय. हा निर्णय झाला तर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 1 लाख 55 हजारापासून ते 1 लाख 76 हजारापर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे.  राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना याचा लाभ मिळणार आहे. 

राज्यातील अंगणवाडी सेविकांना पेन्शन किती द्यायची यावरती विभागाची सल्लामसलत सुरू असल्याची माहिती आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला आणि बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. 

राज्यात सध्या 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका आणि 90 हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे. 

अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय?

  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा.
  • वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत.
  • दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे.
  • मदतनिसांना 20 हजार रुपये मानधन द्या.
  • महागाई दुपटीने वाढते, म्हणून, दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी.
  • सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा.
  • अंगणवाड्यासाठी मनपा हद्दीत 5 हजार ते 8 हजार भाडे मंजूर करावे.
  • आहाराचा दर बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts