राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवारांना धक्का!( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारताच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी (6 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद निकाली लावला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल देत शरद पवारांना मोठा झटका दिला. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. तसेच येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय. 

आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर देवगिरीवर आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.  

बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू होणार आहे. Related posts