Ajit Pawar 10 Arguments Before Election Commission vs Sharad Pawar NCP crisis maharashtra politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar Vs Sharad Pawar : महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच (Ajit Pawar) आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला (Sharad Pawar) स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच शिवसेना पक्ष गेला होता. त्यात आता शरद पवारांचीदेखील भर पडली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय घेताना काही महत्त्वाचे मुद्दे तपासले, त्याचसोबत दोन्ही गटाकडून देण्यात आलेले कागदपत्रांची तपासणीही केली. त्यानंतर राष्ट्रवादीचा निकाल हा अजित पवार गटाकडून लागला. 

अजित पवारांनी निवडणूक आयोगासमोर कोणते मुद्दे मांडले? 

1. पक्षाचा कारभार बेकायदेशीरपणे चालवला जात होता. त्यामुळे पक्ष संघटनेत आणि विधीमंडळ सदस्यांत नाराज होती, त्यामुळे पक्षात फूट पडली. 
2. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. 
3. विविध राज्यात पक्ष संघटना, समित्यांच्या नेमणुकाही नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील आकडेवारी गृहित धरावी.
4. राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यांचे अध्यक्ष निवडताना घटना आणि पक्षाची नियम पाळले गेले नाहीत. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड बेकायदेशीर होती.
5. 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांची झालेली निवड बेकायदेशीर. या अधिवेशनाला कोण हजर होते याची कायद्याप्रमाणे कुठेही नोंद नाही. 
6. 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी अधिवेशनात शरद पवारांना अधिकार नसताना त्यांनी जयंत पाटलांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली.
7. तीन वर्षानंतर निवडणूक होणे गरजेचं असताना, जयंत पाटील निवडणूक न घेता 6 वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदी राहिले. 
8.  शरद पवारांनी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले, घटना आणि नियमानुसार तसं कोणतंही पद नाही. अस्तित्वात नसलेल्या पदावर नेमणुका करण्याचा राष्ट्रीय अध्यक्षांना अधिकार नाही. 
9. राष्ट्रवादीचे खासदार, विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार असे मिळून सदस्य संख्या- 81. त्यापैकी आपल्याला बहुसंख्य आमदारांचा-खासदारांचा पाठिंबा, अजित पवारांचा दावा, अजित पवारांकडे 81 पैकी 51 जणांचा पाठिंबा. तर शरद पवारांकडे 81 पैकी 28 जणांचा पाठिंबा.
10. अजित पवारांना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र – 57
शरद पवारांकडून – 28 प्रतिज्ञापत्र सादर. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts