Pune Crime News Upated pune police parade 300 criminals commissioner office Amitesh kumar pune marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News Upated : पोलिसांनी मनात आणलं तर त्यांच्यासाठी काहीच अशक्य नसतं असं म्हणतात. त्याचा प्रत्यय काल पुणे पोलीस आयुक्तालयात आला. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली. यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ सारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश होता. अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच या गुंडांना मोठा दणका दिला. एरवी मोठ्या मस्तीत समाजात वावरणारे हे गुंड, आज पोलीस आयुक्तालयात आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणं मान खाली घालून उभे होते. छोटे असो वा मोठे, गुन्हे करायचे नाहीत, आणि रील्सही बनवायचे नाहीत.. तरुणांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण वाढेल असं काहीही केलं तर थेट आतमध्ये घेऊ, अशा शब्दांत पोलिसांनी या गुंडांना समज दिली.  पोलिसांनी गुंडाची परेड घेतलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्यात याची चर्चा जोरदार सुरु आहे. 

काय मारणे, घायवळ, बोडके समजलं का? 

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे गुंडांची नावे घेत सूचना देत होते. काय घायवळ, मारणे पोटो समजलं का ? असे विचारल्यावर दहशत पसरवणारे गुंड खाली मान घालून आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणं ऐकत होते. पुणे शहरातील 32 टोळ्यांतील टोळी प्रमुख गुंडासह 267 गुन्हेगारांची परेड मंडळवारी घेण्यात आली. त्यांच्याकडन पोलिसांनी डोजिअर फॉर्म भरुन घेतले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुंडांना बोलवून समोरासमोर सज्जड दम दिल्याची घटना घडली. पोलिसांनी गुंडांना दम दिल्याचा व्हिडीओ पुण्यात सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

गुंडांना पोलिसांची तंबी – 

गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत अवैध धंदे आणि मांडवली बंद करण्याचे आदेश दिले. शहरातील गुंडांची, गुन्हेगारांची नव्याने कुंडली तयार करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी पोलिस आयुक्तालयात परेड घेण्यात आली. शहरातील जुन्या 11 टोळ्या आणि नव्या 21 टोळ्यांतील 267 गुन्हेगारांची पोलीस उपायुक्त अमोल धेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांनी झाडाझडती घेतली. त्यांनी कोणकोणत्या प्रकारे रिल्स तसेच गुन्हे न करण्याची तंबी देण्यात आली. एखाद्या राजाप्रमाणे दरबार भरविणारा महाराज, कंपनीप्रमाणे गुंडांची टोळी चालवणारा निल्या, राजकारण्यांशी घनिष्ट संबंध ठेवून टोळी लावणारा सुऱ्या असे गल्लीबोळातील गुंड पोलिसांसमोर हात जोडून उभे होते. 

अधिक पाहा..

Related posts