Crime Branch arrest another accused in Mohol murder case pune marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Mohol Case :  गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला  (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांनी पाठलाग करत गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या. आता याप्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं (Crime Branch of Pune city police) मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत वरुण मानकर (Abhijit Varun Mankar) याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. 31 वर्षीय अभिजीत मानकर हा दत्तवाडी (Dattawadi) येथील रहिवाशी आहे. 

16 जणांना बेड्या – 

शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  5 जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळ याला कोथरुडजवळ गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगानं सुरु केला. आतापर्यंत 17 जणांविरोधात मोक्का (Pune Police MCOCA Action)लावला आहे, तर आतापर्यंत 16 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

कॉल रेकॉर्डवरुन सुगावा –

शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंत 15000 ऑडिओ क्लिप हाती लागल्या आहेत. यातील सहा फोन रेकॉर्डमध्ये संशयीत डेटा मिळाला आहे. एका कॉल रेकॉर्डमध्ये मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यामध्ये संशयित संभाषण होतं. त्याआधारावर दत्तवाडीच्या 31 वर्षीय अभिजीत मानकर याला अटक करण्यात आली आहे. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मानकरला बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कधी झाली होती शरद मोहोळची हत्या 

शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली होती.शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले.  सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या,  एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.  

आणखी वाचा :

3 राज्यात गुंगारा दिला, संगमनेरजवळ पोलिसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या, गुंड गणेश मारणे कसा पकडला?   

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts