MNS BJP Alliance Secret meeting of Raj Thackeray MNS leaders with Devendra Fadnavis Maharashtra Politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MNS BJP Alliance : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मनसेचे (MNS) तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मनते नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीचं नेमकं कारण काय, भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटीमागचं गुपित आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मागील काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनसे- भाजप यांच्या युतीबाबत अनेकदा चर्चा झाली. सोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील फडणवीसांसोबत बैठक झाली असल्याचे म्हटले आहे. 

मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण 

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच आता भाजप मनसे युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, मनसे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट घेतली आहे. मनसेचे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली असल्याचे समोर येत आहे.. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर आता मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहेत. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts