शरद पवार गटाकडून 'या' 3 पर्यायांची चर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं आहे. नावाबरोबर पक्षाचं चिन्ह म्हणजेच घड्याळ सुद्धा अजित पवार गटाचे असेल असं निवडणूक आयोगाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामध्ये सांगितलं. आयोगाने हा निकाल देताना शरद पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातील अर्ज करण्यासाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

पक्षाच्या नावात शरद पवार नाव असावे यासाठी अनेक नेते आग्रही असल्याचं समजतं. त्यामुळेच शरद पवारांच्या गटाची नाव निवडणूक आयोगाकडे दिलं जाणार आहे ते नाव ‘राष्ट्रवादी शरद पवार’ असं आहे. यापूर्वी शरद पवार गटाकडून ज्या 3 पर्यायांची चर्चा होती त्यपैकी 2 नावांमध्ये शरद पवारांचा उल्लेख असल्याचं सांगण्यात आलं होतं.

‘राष्ट्रवादी शरद पवार’, ‘मी राष्ट्रवादी’ आणि ‘शरद पवार स्वाभिमानी पक्ष’ असे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र आता ‘राष्ट्रवादी शरद पवार’ हे नाव निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने या चिन्हाच्या जागी शरद पवार गट कोणतं चिन्ह घेणार याबद्दलही शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. सुरुवातीला शरद पवार गट ‘कपबशी’, ‘सूर्यफूल’, ‘चष्मा’ आणि ‘उगवता सूर्य’ असे पर्याय देणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता ‘वटवृक्ष’ हे चिन्ह शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


हेही वाचा

भाजप-मनसे युती होण्याच्या चर्चांना उधाण


राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवारांना धक्का!

[ad_2]

Related posts