NCP Crisis latest news Amol Mitkari reaction NCP symbol and party ajit pawar vs sharad pawar maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amol Mitkari on NCP News Update : लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे गेलं आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटणार आहेत. लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.

आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेणार

वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळं आपसूक पक्ष कार्यालयं आमच्या बाजूला येईल.’

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts