UAE to get 1st Hindu temple Here s all you need to know about BAPS Hindu Mandir PM Modi to inaugurate BAPS Hindu Mandir in UAE on Feb 14 marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

UAE BAPS Hindu Temple : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) पहिलं हिंदू मंदिर (Hindu Mandir) तयार झालं असून लवकरच याचं उद्घाटन पार पडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथील भव्य BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 14 फेब्रुवारी रोजीला हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. अबू धाबीमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वीच अनेक देशांचे दिग्गज मंत्री या कार्यक्रमासाठी अबूधाबीत पोहोचले आहेत.

मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) पहिलं हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये तयार झाले आहे. 14 फेब्रुवारीला या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून यासाठी अनेक संत, महंत पाहुणे म्हणून अबुधाबीला पोहोचले आहेत. हे मंदिर 27 एकर जागेत उभारण्यात आलं आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटान सोहळ्यानंतर आता पंतप्रधानांच्या हस्ते आणखी एका भव्य मंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे.

UAE मधील पहिलं हिंदू शैलीतील मंदिर

BAPS हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित, ही भव्य रचना भारत आणि UAE यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचा पुरावा आहे, सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. अबुधाबी येथील या मंदिरात उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये 14 फेब्रुवारीला BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन करतील. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी अनेक देशांचे मुत्सद्दी युएईमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्स, जर्मनी, इस्रायल, इटली, कॅनडा, आयर्लंड, बहरीन, आर्मेनिया, बांगलादेश, घाना, चाड, चिली, युरोपियन युनियन, फिजी, अर्जेंटिना, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, गॅम्बिया येथील राजदूतांचा समावेश आहे.

मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या आतील बांधकामात 40,000 घनफूट संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराचं बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल यांनी सांगितलं की, “आमचा बांधकामादरम्यान प्रवास नावीन्यपूर्ण होता आणि आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. आम्ही उष्णता-प्रतिरोधक नॅनो टाइल्स आणि काचेच्या जड पॅनल्सचा वापर केला आहे.”

BAPS हिंदू मंदिराची खासियत, जाणून घ्या

  • BAPS हे UAE मधील पहिलं हिंदू मंदिर आहे.
  • BAPS हिंदू मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी UAE मध्ये नेण्यात आले.
  • अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 2015 मध्ये पंतप्रधान मोदीच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी 13.5 एकर जमीन दान केली होती.
  • UAE सरकारने जानेवारी 2019 मध्ये मंदिरासाठी आणखी 13.5 एकर जमीन दान केली. अशा प्रकारे एकूण 27 एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे.
  • 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती.
  • BAPS मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक युएईच्या अमिरातीचे प्रतीक आहेत.
  • BAPS मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे.
  • मंदिराच्या पायामध्ये 100 सेन्सर बसवण्यात आले आहेत. भूकंपाची शक्यता आणि तापमान बदल तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत.
  • मंदिराच्या बांधकामासाठी 400 दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे.

 

 

अधिक पाहा..

Related posts