Anil Deshmukh Speech Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anil Deshmukh Speech : अनिल देशमुखांच्या भाषणावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी  भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात पारडसिंगा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.. या महिला मेळाव्यासाठी महिला बचत गटाच्या महिला, तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी प्रत्येक गावातून 100 महिला आणाव्या असा पत्रच काटोलच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पाठवलं आहे.. तसेच या 100 महिलांच्या नेआण करण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च व वाहन खर्च ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून देण्यात यावं असा आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे… भाजपने राजकीय मेळावा घ्यावा, मात्र तो शासनाच्या निधीतून घेऊ नये असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला आहे…

[ad_2]

Related posts