adv Siddharth Shinde claims Sharad Pawar party temporary name symbol may retain like shiv sena uddhav thackeray maharashtra politics( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: ज्याप्रकारे शिवसेनेला (Shiv Sena) मिळालेला तात्पुरतं नाव आणि चिन्ह नंतर कायम राहिलं, त्यानुसार शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे (Adv. Siddharth Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आज केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) असं नवीन नाव निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलं आहे. त्यावर अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाला अशाच पद्धतीने तात्पुरतं नाव देण्यात आलं होतं, ते आता कायम राहिलं आहे. त्याच पद्धतीने आता शरद पवार गटाला मिळालेलं नाव आणि चिन्हंही कायम राहण्याची शक्यता आहे. 

अॅड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, शरद पवार गट आता सुप्रीम कोर्टात जाईल आणि कदाचित म्हणेल की आम्हाला मिळालेलं तात्पुरतं नाव कायम राहावं. राज्यसभेच्या निवडणुकीत चिन्ह असल्यामुळे  सध्या फक्त नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं तेच कदाचित पवारांच्या बाबतीत घडू शकेल, म्हणून त्यांनी आधी नाव घेतलं आहे, नंतर ते सुप्रीम कोर्टात जातील. 

शरद पवार गटाचं नवीन नाव

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. 

पक्षाच्या चिन्हावर अद्याप निर्णय नाही

पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला अद्याप चिन्ह देण्यात आले नाही. चिन्हाबाबत पवार गटाकडून पर्याय देण्यात आलेत.  शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

Related posts