Ms Dhoni Best Captain For Team India Very Successful Said Mohammed Shami Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mohammed Shami Team India : आतापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवले आहे. प्रत्येकाने टीम इंडियाला (Team India) वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. पण टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची उत्तरेही प्रत्येकाची वेगवेगळी असतील. पण हात प्रश्न भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याला विचारण्यात आला. यावर मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने मजेशीर उत्तर दिलेय. भारताचा सर्वात बेस्ट कर्णधार कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना शामी म्हणाला की,  एखाद्याला यशस्वी म्हणणे म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना केल्यासारखं आहे. पण प्रत्येकाच्या यशावर नजर टाकली तर धोनीला सर्वोत्कृष्ट म्हटले जाईल.

मोहम्मद शामी याने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्याने क्रिकेटसंदर्भातील अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचेही यावेळी त्याने सांगितले. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न यावेळी मोहम्मद शामीला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, अशा प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना करत आहात. कोणत्याही एका व्यक्तीला यशस्वी म्हणणे योग्य नाही. कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचे झाले तर त्याने जे काही साध्य केले आहे ते कोणीही करू शकलेले नाही.

धोनीच्या नेतृत्वात भारताची उंच भरारी – 

माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे विश्वचषक आणि T20 विश्वचषक उंचावला आहे. त्याशिवाय इतर आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. यासह आशिया चषकाचे विजेतेपदही पटकावले. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघांनाही पराभूत केले. धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार राहिली आहे. यासोबतच तो इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्येही यशस्वी राहिला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला यश मिळवून दिले. चेन्नईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईचा संघ विजेता ठरला.

आणखी वाचा :

Virat Kohli : विराट कोहली पुढील दोन कसोटीतून सुद्धा बाहेर; जडेजा-राहुलचा काय निर्णय झाला?



[ad_2]

Related posts