Pune Traffic news aam admi party protest against pune Traffic in warje area Pune( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण (Pune Traffic) झाला आहे. पुण्यातील बंद सिग्नल आणि बंद असलेल्या यंत्रणा जबाबदार आहे. या वाहतूक कोंडीला वैतागून पुण्यातील आम आदमी पक्षाच्यावतीने (Aam Admi party) अनोखं आंदोलन करण्यात आलं. त्यांनी थेट पुण्यात थेट सिग्नल यंत्रणेची पूजा करुन या सिग्नलला हार वाहिले आणि घोषणाबाजी करण्यात आली. 

पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीचे अनोखे आंदोलन केले.  वारजे विभागाच्या आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे व गेल्या पाच वर्षापासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचा पूजा करून निषेध करण्यात आला. या ठिकाणी रोज सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. गेल्या पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या सिग्नल यंत्रणा जर चालू झाली तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल असे मत शहर उपाध्यक्ष  निलेश वांजळे यांनी मांडले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिग्नल यंत्रणेला हार फुलं वाहिली. 

वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवा; विजय वडेट्टीवार

पुण्यातील वाहतूक कोंडीवर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस (Pune News) बिकट होत चालला आहे. मेट्रोची नियोजन शून्य कामे, ढिसाळ नियोजन यामुळे पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी अक्षरशः रडतायत याला जबाबदार मेट्रो आणि पालिका प्रशासन आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला तात्काळ वठणीवर आणले पाहिजे. पालिका प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन करावे. अन्यथा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुण्यानं दिल्लीला मागे टाकलं

पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलेय. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरलेय. पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलेय. एम्स्टर्डमच्या टॉमटॉम कंपनीने जगातील 387 शहराच्या वाहतूक कोंडीचा रिपोर्ट जारी केलाय. 2023 च्या या रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये जगभरात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. आयरलँडमधील डबलिन दुसऱ्या तर टोरंटो तिसऱ्या क्रमांकावर आहे.  टॉप 10 शहरांमध्ये भारतातील दोन शहरांचा (बेंगलोर आणि पुणे) क्रमांक लागतो.  बंगळुरु भारतातील पहिले तर जगभरातील सहावे वाहतूक कोंडी होणारं शहर आहे. या यादीमध्ये पुणे सातव्या क्रमांकावर आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : रोहित पवारांचा अंगरक्षक असल्याचं सांगत थेट पिस्तूल काढली; पुण्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

Related posts