iPhone 16 Series could come with underwater mode user can click photos and video under 40 meter depth water marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 16 Series : Apple iPhone 15 च्या लॉन्चिंगनंतर iPhone 16 संबंधित अनेक चर्चा सध्या बाजारात सुरु आहेत. तसं पाहिलं तर, iPhone यूजर्स नेहमी काही नवीन आणि अनोख्या वैशिष्ट्यांची वाट पाहत असतात. आणि आयफोन निर्माता कंपनीही आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काहीना काही नवीन अपडेटेड व्हर्जन घेऊन येत असते. यावेळी ॲपल एका खास फीचरवर काम करत आहे, ज्याचे पेटंट डिझाईन समोर आलं आहे. हे फीचर नेमकं कोणतं ते जाणून घेऊयात. 

iPhone मध्ये येणार अंडरवॉटर Mode 

आतापर्यंत आयफोनमध्ये आपण अनेक नवनवीन फीचर पाहिले. पण तुम्ही वॉटरप्रूफ तसेच अंडरवॉटर मोड पाहिला आहे का? खरंतर, ॲपलला आयफोनमध्ये अंडरवॉटर मोड द्यायचा आहे. हे विशेष फीचर आल्यानंतर यूजर्सना खोल पाण्यातूनही आपला आयफोन वापरता येणार आहे. तसेच, कंपनी कोणत्या आयफोन सीरीजमध्ये हे विशेष फीचर सादर करेल या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार ॲपल 2024 मध्ये येणाऱ्या नवीन iPhone 16 सीरीजमध्ये हे अंडरवॉटर फीचर सादर करणार आहे अशी माहिती आहे. 

युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) च्या पेटंटचे नवीन पृष्ठ क्रमांक 78 उघड झाले आहे. हे पेटंट पाहता फोन अंडरवॉटर कसा काम करू शकतो हे स्पष्ट करण्यात आलं आहे. या पेटंटमध्ये आयफोनचा इंटरफेस पाण्याखाली दिसू शकतो. मात्र, आयफोनची ऑपरेटिंग सिस्टीम अजूनही ओला आयफोन चालवण्याइतकी सक्षम नसल्याची माहिती या पेटंटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी अंडरवॉटर इंटरफेसचा वापर केला जाणार आहे. या इंटरफेसमध्ये स्ट्रीमलाईन मेनू आणि मोठी हार्डवेअर बटणे अधिक वापरली जातील.

कॅमेरा व्हॉल्यूम रॉकर बटणासह काम करेल

यूजर्स आगामी आयफोन अंडरवॉटरही वापरू शकतील. या फोनला पाण्याखाली वापरण्यासाठी फोनमधील अंडरवॉटर मोड चालू करावा लागेल. त्यानंतर यूजर्स पाण्याखाली कॅमेरा वापरू शकतील आणि त्यासाठी त्यांना स्क्रीनला टच करण्याऐवजी व्हॉल्यूम रॉकर बटण प्रेस करावं लागेल. तसेच, व्हॉल्यूम रॉकर किंवा फोनच्या इतर बटणांचा वापर करून, यूजर्स खोल पाण्याखाली देखील आयफोनवरून उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील.

महत्त्वाच्या बातम्या : 

Nokia Smartphone : Nokia च्या नवीन हेड ची नियुक्ती; 2024 मध्ये 10 हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts