Virat Kohli Praised Shubman Gill and Gives Special Message On His First IPL Century GT vs SRH IPL 2023; शुभमन गिल लवकरच करणार टीम इंडियांचं नेतृत्व? विराटने कौतुक करताना दिला वेगळाच इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद: शुभमन गिलने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले आणि सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्येच आता विराट कोहलीने त्याचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. IPL 2023 मध्ये शुभमन गिलने सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ५८ चेंडूत चौकारांच्या मदतीने आयपीएलचे पहिले शतक झळकावले. त्याच्या कौतूकासह विराटने एक खास मेसेजही त्याच्यासाठी लिहिला आहे.कोहलीकडून गिलचे जोरदार कौतुक

विराट कोहली नेहमीच युवा खेळाडूंना सपोर्ट करतो आणि त्यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाही. शुभमन गिलच्या शतकानंतर त्याने मंगळवारी सकाळी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. विराटने शुभमन गिलला पुढच्या पिढीचा स्टार म्हटले. आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये गिलला टॅग करत कोहलीने लिहिले, “जिथे क्षमता आहे तिथे गिल आहे. पुढे जा आणि पुढच्या पिढीचे नेतृत्व कर. शुभमन गिल तुला आशीर्वाद.

Virat Kohli Instagram Story For Shubman Gill

शुभमन गिल स्टार

विराटने शुभमन गिलचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वनडेमध्ये द्विशतक झळकावताना विराटने या खेळाडूला स्टार म्हटले होते. शुभमन गिल हे भारतीय क्रिकेटचे भविष्य असल्याचे त्याने सांगितले होते. विराट कोहलीचा मुद्दाही बरोबर आहे. गेल्या एका वर्षात शुभमन गिलने ज्याप्रकारे प्रत्येक फॉरमॅटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत, त्यामुळे त्याची ख्याती अधिकच उंचावत आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये शुभमन गिलने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ५७६ धावा केल्या आहेत. गिलने या काळात शतकही केले आहे. जो सोमवारी हैदराबादविरुद्ध झाले. गुजरात टायटन्ससाठी १००० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

शुभमन गिल विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. गिलने एका मुलाखतीत सांगितले की, तो विराट कोहलीला आपला प्रेरणास्थान मानतो. तो त्याचा आदर्श आहे. त्याचा त्याग, तपश्चर्या आणि सामर्थ्य शुभमन गिलला प्रेरणा देते. शुभमन गिलनेही विराट कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. यावर्षी या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावले. गिलने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने अवघ्या ६३ चेंडूत १२६ धावांची खेळी केली. याच वर्षी गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीतही शतक झळकावले होते. हा खेळाडू आता एका वेगळ्याच स्तरावर पोहोचला असून विराट कोहलीसारखी धावांची भूक त्याच्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

[ad_2]

Related posts