WTC Final 2023 Green Catch To Dismiss Gill Triggers Debate After Third-umpire Kettleborough’s Decision

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली, पण आठव्या षटकात शुभमन गिल झेलबाद झाला.. पण पंचांचा हा निर्णय वादग्रस्त ठरलाय. शुभमन गिल याचा कॅमरुन ग्रीन याने घेतलाला झेल स्पष्ट नव्हता.. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीवर टेकल्याचे दिसत होते. असे असतानाही तिसऱ्या पंचांनी गिल याला बाद देत वाद ओढावून घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या या निर्णायानंतर चाहत्यांचा राग अनावर गेला. स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी चीटर चीटर अशा घोषणाच दिल्या. सोशल मीडियावरही पंचांच्या निर्णायाची चर्चा रंगली.

स्कॉट बोलँड  आठवे षटक घेऊन आला, स्ट्राईकवर शुभमन गिल होता… बोलँडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर गिल याने मोठा फटका मारला… पण चेंडू गलीमध्ये असणाऱ्या कॅमरुन ग्रीनच्या दिशेने गेला… ग्रीन याने एका हाताने भन्नाट झेल घेतला. त्याच्या या झेलावर निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचांनी बराच वेळ लावला. चेंडू जमिनीवर घासल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते, असे असतानाही पंचांनी गिल याला बाद दिले. त्यानंतर सर्वांचाच मनस्ताप झाला. मोक्याच्या क्षणी पंचाच्या निर्णायामुळे भारताला मोठा धक्का बसला.


पंचाच्या निर्णायानंतर रवि शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली. समालोचन करताना शास्त्री म्हणाले की, गिलच्या जागी स्मिथ असताना तर पंचांनी नाबाद दिले. विरेंद्र सेहवाग यानेही ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. अनेक माजी क्रिकेटपटूंनी पंचांच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरही नेटकर्यांनी आपला राग व्यक्त केलाय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 270 धावांवर घोषित केलाय. पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिलेय. भारतीय संघाला 137 षटकात हे आव्हान पार करायचे आहे.  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी याने सर्वाधिक 66 धावांचे योगदान दिलेय. टीम इंडियाकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

 



[ad_2]

Related posts