Uddhav Thackeray’s branch meeting tomorrow in North West Mumbai Lok Sabha Constituency ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची उद्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शाखाभेट ABP Majha
एकीकडे ठाकरेंचा मुंबईतील एक आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.  तर उद्धव ठाकरे उद्यापासून मुंबईतल्या शाखांना भेटी देणार आहेत. उद्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील 6 शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. याच मतदारसंघातील ठाकरेंचा एक आमदार फुटणार आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शाखाभेटीदरम्यान तो आमदार उपस्थित राहणार की शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार याची जोरदार चर्चा रंगलीय. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. जोगेश्वरी पूर्वेतून रविंद्र वायकर, दिंडोशीतून सुनील प्रभू तर अंधेरी पूर्वेतून ऋतुजा लटके हे आमदार आहेत. त्यामुळे या तीन आमदारांपैकी रविंद्र वायकर हेच शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय.

[ad_2]

Related posts