ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालणारा मौरिस भाई कोण होता?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.

मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  

गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला आहे. तर, मारेकरी मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. कोण आहेत अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईंशी संबध काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

कोण आहे मॉरीस भाई? 

मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई म्हणून ओळखला जातो.

मौरिस नोरोन्हा याने स्वत:ला पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता, कोविड योद्धा आणि परोपकारी असे घोषित केले आहे. 

 मॉरिस भाई बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप  मॉरिस भाईवर आहे.

मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.  पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही  मॉरिस भाईवर आहे.  मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. 

गुरुवारच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून मॉरीस पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो समोर आल्याचे हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळीबाराच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.


[ad_2]

Related posts