India U 19 Will Play Final Match Against Australia U19 World Cup 2024 Benoni Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

U19 World Cup 2024 Final, IND vs AUS : रविवारी भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये  अंडर 19 वर्ल्डकप फायनल (World Cup Final) होणार आहे. गुरुवारी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर (Aus vs Pak) थरारक विजय मिळवला. भारत यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचलाय. सहा महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पराभव करत पॅट कमिन्सच्या संघाने जेतेपद मिळवले होते. आता याच पराभवाचा बदला घेण्याची संधी युवा भारतीय संघाकडे असेल. 

अंडर-19 वर्ल्डच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एक विकेटनं पराभव केला. अखेरच्या षटकांपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने संयमाने पाकिस्तानच्या माऱ्याचा सामना करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विलोमूर पार्कमध्ये अंतिम लढत होणार आहे. सहा महिन्याच्या आत दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी भिडणार आहेत. 2023 मध्ये वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता. त्या सामन्यात पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषक उंचावला होता. आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे हा बदला घेण्याची सूवर्णसंधी असेल. 

सहा महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मारली होती बाजी – 

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये भारताच्या सिनिअर संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या सिनिअर संघाचा आमनासामना झाला होता. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले होते. ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली होती. 

बदला घेण्याची सूवर्णसंधी – 

आता 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होत आहे. अंडर 19 च्या या फायनलकडे जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष असेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बदला घेण्याची संधी युवा ब्रिगेडकडे असेल. 2023 च्या पराभवाची सल प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. युवा भारतीय संघातील कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धास, सौमी पांडे यासारखे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघाला विजयाचा दावेदारही म्हटले जातेय. टीम इंडियाने आतापर्यंत एकतर्फी विजय मिळवलाय. 

आणखी वाचा :

Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??



[ad_2]

Related posts