singer arijit singhs highly anticipated pune concert rescheduled due to overwhelming response( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : प्रसिद्ध गायक अरिजित सिंह (Arijit singh) त्याच्या पुण्यातील एका कॉन्सर्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यात अरिजित सिंहचा कॉन्सर्टला कायम तुफान गर्दी होते. त्यातच कॉन्सर्टची तारीख जाहिर होताच या तिकिटांची विक्री भरपूर प्रमाणात झाल्याने कॉन्सर्ट पुढे ढकलावा लागला आहे.  अरिजितच्या आवाजाने पुन्हा पुणेकरांचे काळीज धडधडणार असून, देशासह जगभरात आपल्या आवाजाने तरुणाईचे मने जिंकत त्यांना वेड लावणारा लोकप्रिय गायक अरिजित सिंहचा पुण्यातील कार्यक्रम जाहिर होताच काही दिवसातच ‘ओहर फ्लो’ झाला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता या कार्यक्रमाची तारीख बदलली गेली आहे. गायक प्रेमींनी पहिल्या काही दिवसातच ‘तिकट’ फुल केल्याने या कार्यक्रमाचे ठिकाण देखील बदलावे लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. 

अरिजित सिंहचा कॉन्सर्ट 3 मार्चला होणार होता आता हे कॉन्सर्ट 17 मार्चला होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध टू-बीएचकेकडून गेल्या वर्षी ‘राजा बहाद्दुर मिल्स’ येथे गायक अरिजित सिंहचा कार्यक्रम घेतला होता. त्याला रसिक पुणेकरांनी प्रचंड दाद दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अरिजित सिंह पुण्यात कॉन्सर्टला येणार होता मात्र तारिख जाहिर होताच या तिकिटांवर पुणेकर तुटून पडल्याचं दिसलं. काही क्षणातच तिकिटं फुल्ल झाली. अनेक नवीन गायकांना आणि संगीतप्रेमींना अरिजित सिंहचा कॉन्सर्ट बघायचा असतो. या सगळ्यांचा हिरमोड  होऊ नये म्हणून कॉन्सर्टची तारीख आणि जागा बदलण्यात आली आहे. 25 हजार लोकांची क्षमता असलेलं ठिकाण या कॉन्सर्टसाठी निश्चित करण्यात येणार आहे. 

अरिजीत सिंह हा सध्याच्या तरुणांचा आवडता गायक आहे. त्याचा लाईव्ह गाणं ऐकणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक तरुणांच्या तोंडी सध्या अरिजीत सिंहचं गाणं दिसतं. येत्या नव्या वर्षात अरिजीत सिंहचं गाणं लाईव्ह ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. प्रत्येक प्रेमात पडलेल्याला आणि प्रेमभंग झालेल्याला अरिजित सिंह सावरुन नेतो असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कॉन्सर्टच्या गाण्याची लिस्टदेखील तयार करत असतात. फिर ले आया दिल, कबीरा (ये जवानी है दीवानी), मस्त मगन (2 स्टेट्स), जुदाई (बदलापुर), चन्ना मेरेया (ए दिल है मुश्किल), तुम ही हो (आशिकी 2),दुआ (संघाई), गेरूआ,इलाही (ये जवानी है दीवानी), नशे-सी-चढ गई (बेफिक्रे) या गाण्यांची चाहते कायम फर्माईश करत असतात. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar On Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले असे गुन्हे…

अधिक पाहा..

Related posts