अभिषेक घोसाळकर खून प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच करणार( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईतील दहिसर परिसरात गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी मोठी घटना घडली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हो नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर आरोपीने आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.

मुंबईत गेल्या दहा दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून सत्तेत असलेल्यांवर टीका होत आहे. दरम्यान, हे प्रकरण जलद तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा खून जुन्या वादातून झाला असावा, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हत्या पूर्वनियोजित असून आरोपी मॉरिसने घोसाळकर यांना कार्यालयात बोलावले होते. यानंतर  फेसबुक लाईव्ह करताना त्यांची हत्या केल्याचे सांगितले.

दरम्यान, गुन्हे शाखेनेही आम्ही घटनास्थळावरून पुरावे हस्तगत केल्याचे स्पष्ट केले असून या खून प्रकरणाचा प्रत्येक पैलूतून तपास केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर येणार आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या घटनेने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा

अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मारेकरी मॉरीस भाई यांचा संबध काय?


महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का?

Related posts