बावनकुळेंच्या बॅनरवर फोटो, नागपूरच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणेंना पदावरून हटवले( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur News नागपूर : काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप नेते परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काटोल परिसरात अभिनंदनाचे होर्डिंग्स लागले होते. त्यावर नागपूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे (Rajendra Harne) यांचेही फोटो झळकले होते. त्यानंतर आता राजू हरणे यांना तत्काळ पदावरून हटवण्यात आले आहे. 

त्यांच्या जागी उत्तम कापसे (Uttam Kapse) यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते परिणय फुके यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होर्डिंग्सवर राजू हरणे यांचे फोटो झळकल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची चर्चा आहे. 

होर्डिंगवर इतर पक्षातील स्थानिक नेत्यांचेही फोटो

भाजप आणि इतर पक्षीय नेत्यांशी वाढत चाललेली जवळीक राजेंद्र हरणे यांच्यावर झालेल्या कारवाईचा प्रमुख कारण आहे का? अशीदेखील चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे आणि परिणय फुके यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन करणाऱ्या ज्या होर्डिंग वर राजू हरणे यांचे फोटो झडकले होते त्या होर्डिंग वर इतर पक्षातील ही अनेक स्थानिक नेत्यांचे फोटो असल्याचे दिसून आले. 

होर्डिंग्स लावणं पडलं महागात 

नागपूरच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांना हे होर्डिंग लावणे चांगलेच महागात पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू हरणे यांची भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांशी जवळीक वाढत चालली होती. यामुळे त्यांच्यावर ही तडकाफडकी कारवाई करण्यात आल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवर रंगली आहे. दरम्यान, राजू हरणे यांना पदावरून हटवल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून  उत्तम कापसे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना जामीन मंजूर

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी कुणाल राऊतांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी  करत पोलिसांची मागणी फेटाळत जामीन मंजूर केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pakistan Election: नवाझ शरीफ यांचा बालेकिल्ला पंजाबमध्ये इम्रान समर्थक पुढे, शाहबाज सरकारच्या अनेक मंत्र्यांना पराभवाचा धोका

Nagpur News : पुण्यानंतर नागपूरमध्येही गुन्हेगारांची परेड, नवे आयुक्त रवींद्र सिंगल यांचा दादा-भाईंना ‘डोस’

अधिक पाहा..

Related posts