Akola Crime Marathi News Youth Suspected Death Family Blame Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शिवराज गावंडे नामक युवकाने वीस दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका किरकोळ अपघात प्रकरणात दोन पोलिसांनी मानसिक छळ केल्यानेच त्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 

 

पोलिसांकडून शिवराजचा मानसिक छळ? कुटुंबाचा गंभीर आरोप

या घटनेमुळे शिवराज गावंडे याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याचे कारण, घरातील एकमेव आधार असलेला शिवराज आता या जगात नसल्याने संपूर्ण अकोट शहरात शोककळा पसरली आहे. शिवराजने 20 ऑगस्टला आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याला कारण ठरलंय 2 जुनला एका दुचाकीला लागलेला किरकोळ धक्का. याप्रकरणी अकोल्यातील जुने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होताय. मात्र, गुन्ह्यात उल्लेख केलेली शिवराजची दुचाकी घटनास्थळावर नसल्याचा दावा कुटूंबियांनी केला आहे. या प्रकरणी शिवराजचा दोन पोलिसांनी मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. 

भावाच्या दोन्ही मुलींना त्यानं पितृछत्र

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज हा अकोट मधील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीशी जुळला होता. तो राष्ट्रवादीप्रणीत शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा अकोला जिल्हाध्यक्ष होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भावाच्या विधवा बायकोशी विवाह करीत त्याने समाजात आदर्श घालून दिला होता. भावाच्या दोन्ही मुलींना त्यानं पितृछत्र दिलं होतंय. शिवराजच्या आत्महत्येनं त्याचं सारंच कुटुंब उघड्यावर आलं आहे.

त्या दोन्ही पोलिसांविरूद्ध तक्रार 
याप्रकरणी शिवराजच्या आईने अकोट शहर पोलिसांत दोन्ही पोलिसांविरूद्ध तक्रार केली आहे. पोलीस कुटुंबियांच्या आरोपांसह आत्महत्येच्या कारणाच्या इतर शक्यतांवरही तपास करतायेत. 

शिवराजच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित
शिवराज गावंडेंच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित झालेयेत. अनेकांचा आधार असलेल्या शिवराजच्या आत्महत्येच्या निर्णयावर म्हणूनच शंका उपस्थित होतीये. या प्रकरणाचा योग्य तपास करीत अकोट पोलिसांनी योग्य न्याय द्यावा हीच माफक अपेक्षा त्याच्या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे.

अकोल्यात आणखी एक धक्कादायक घटना

काही दिवसांपूर्वी अकोल्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती, नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला होता. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीची आईला ताब्यात घेतले. अकोला शहरातील बलोदे लेआऊटमधील ही घटना आहे.

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश! मुंबई पोलिसांना मोठं यश, सायबर गुन्हेगाराच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये

[ad_2]

Related posts