[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांची काढलेली परेड चांगलीच (Pune Crime news) चर्चेत आहे. सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट (Pune Police) करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अशा खड्या शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे.
पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस सुमारे 500 गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. त्यांना सज्जड दम दिला. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सुचना दिल्या मात्र तरीही या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करणं सुरुच आहे. असे प्रकार सुरु असतील तर या सगळ्या गुन्हेगारांना खाक्या दाखवायला हव्या. आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नेमकी कारवाई कोणती करायची किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
रिल्स काढून स्टंटबाजी सुरुच
पुण्यातील कुख्यात गुंडाकडून मंत्रालयात रिल्स काढून स्टंटबाजी करण्याचा प्रकार समोर आला. मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला गेलेल्या एका गुंडाचा फोटो तसचं आसिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट असे अनेक प्रकार पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50 टोळ्यांतील सुमारे सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले.
पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना
पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यात गु्न्हेगारांना तंबी दिली जात आहे. मात्र तारीही शहरात असे प्रकार कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे सगळ्या अट्टल गुन्हेगारांना सज्जड दम दिल्यानंतरही गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तीरीही गुन्हेगारी थांबली नाही तर पुणे पोलीस कठोर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Ajit Pawar On Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले असे गुन्हे…
अधिक पाहा..
[ad_2]