लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold-Silver Price on 9 February 2024: लग्न सराईचे दिवस असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचे ठरवत असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर जाणून घ्या. शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 6,496 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 5,895 रुपये इतकी आहे. (Gold Rate Today)

24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून -0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. तर, आज चांदीचा भाव 73,500 प्रति किलो इतका आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,200 रुपये इतकी आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 62,400 आहे. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर

– पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,200 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,400 रुपये असेल. 

– नागपूरमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,200 इतका असेल तर 24 कॅरेट सोन्यासाठी 62,400 इतका असेल. 

– नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,200 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 62,400 इतका आहे. 

सोने आणि चांदीच्या किंमतीतील चढ-उतार हे सोन्याच्या पेढीसह इतर घटकांवरही परिणाम करतात. सोन्याची जागतिक मागणी, चलन मुल्यातील चढ-उतार, व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंबंधी सरकारी नियम यासारखे घटकही यात मोलाची भूमिका बजावतात. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर देशातील चलनाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचादेखील मोठा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर होत असतो.  

Related posts