Xiaomi Comes To India And Make Wireless Audio Products Partnership With Optiemus Electronics Company Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Xiaomi India : मोबाईलची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेली शाओमी कंपनी भारतामध्ये आपला पहिल्या लोकल ऑडीओ उत्पादनाची निर्मिती करणार आहे. यासाठी शाओमीने Optiemus Electronics कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. उत्तर प्रदेशच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये वायरलेस ऑडिओ प्रॉडक्ट्सची निर्मिती करणार आहे. 2025 पर्यंत स्थानिक बाजारपेठेत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचे प्रोडक्शन 50 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यावरून कंपनीने चांगलीच तयारी केल्याचे दिसून येते. सध्या कंपनी ऑडिओ उत्पादनाची निर्मिती करते, पण भारतात मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. यामुळे आता Xiaomi भारतात  Wireless Audio उत्पादने बनवण्यासाठी बाजारपेठेत उतरणार आहे. 

सध्या शाओमीच्या भारतीय टीमकडून लोकल मार्केटसाठी मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीची निर्मिती केली जाते. पण आता कंपनी त्यांचे ऑडिओ उत्पादनेही भारतात निर्मिती करण्याचे ठरवले आहे. कंपनीने याआधीपासून बाजारात त्यांचे इअरबड्स, स्पीकर, हेडफोन आणि वायरलेस ब्लूटूथ डिव्हाइसेसची विक्री करत आहे. आता कंपनी Optiemus Electronics  या कंपनीसोबत पार्टनरशिपमध्ये ऑडिओ उत्पादनाची निर्मिती करणार आहे. भारत सरकारनेही सांगितले की, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (MNCs) देशात येऊन लोकल मॅन्युफॅक्च्युरिंगला प्रोत्साहन द्यावे. यामुळे देशातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल आणि देश आत्मनिर्भरही बनवला जाऊ शकतो. या मॅन्युफॅक्चरिंमुळे देशातील युवकांचा कौशल्य विकासही होईल. 

Xiaomi ला पिछाडीवर टाकत सॅमसंग बनला भारतातील नंबर वन ब्रँड

Xiaomi ही चिनी मोबाईल निर्मिती कंपनी आहे. कंपनीला भारतात गेल्या तिमाहीत 18.9 टक्के इतका तोटा झाला आहे. याचं कारण कोरोना महामारीमुळे मोबाईलच्या मागणीमध्ये घट झाली आहे. इतकेच नाही तर कंपनीला चीनच्या बाजारपेठेतही विक्रीच्या बाबतीत 20 टक्के डाउनफॉलचा सामना करावा लागला आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये मोबाईलच्या बाजारपेठेत 11 टक्क्याची घट झाली आहे. तसेच शाओमीचा भारतातील व्यवसायही मंदावला आहे. त्यामुळे कंपनीची टॉप लिस्टमधून घसरण झाली आहे. शोओमीला पिछाडीवर टाकत आता सॅमसंग टॉपची कंपनी बनली आहे. यावर्षी सॅमसंग मोबाईलच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे दीर्घकाळ टॉपवर राहिलेल्या शाओमीला सॅमसंगने पाठीमागे टाकले आहे. शाओमीची या दोन कारणांमुळे घसरण झाली आहे, एक मार्केटमधील मागणीत घट आणि दुसरे आपल्या उत्पादनांमध्ये लोकांच्या आवडी-निवडीनुसार बदल करता आला नाही. त्यामुळे सध्या शाओमीला मंदीचा सामना करावा लागत आहे.

इतर बातम्या वाचा :

Xiaomi 13 Series : 12GB रॅम आणि दमदार कॅमेरा फिचर्ससह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लॉन्च; वाचा डिटेल्स

[ad_2]

Related posts