Manoj Jarange Patil : “…तर मंडल आयोगालाच चॅलेंज करतो, काय होईल ते बघूच मग”; मनोज जरांगेंचा इशारा( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Patil नाशिक : मराठ्यांची नियत खराब नाही म्हणून नाहीतर आतापर्यंत चॅलेंज झालं असतं. मला गोरगरिबांचे वाटोळं करायचे नाही. आता ७५ वर्षांनी सग्यासोयऱ्यांचा मोठा कायदा बनला आहे. याच्यात जर काही याचिका दाखल झाल्या तर मंडल आयोगालाच चॅलेंज करतो काय होईल ते बघूच मग, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी नाशिक (Nashik) येथे आले असता ते बोलत होते.  

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एकदा मंत्री आलेला डबल आपल्याकडे येत नाही. ते म्हणतात आम्ही परत त्यांच्याकडे जात नाही. प्रत्येक वेळी खांदा बदलून येतात. मला हिंदी कळत नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे पण कार्यक्रमच लावतो. पत्रकार कलाकार असतात. हिंदीत विचारतात मी उत्तरे देतो, पण त्यालाही कळत नाही अन् मी काय उत्तर दिले मलाही कळत नाही. नाशिक जिल्हा पुण्यवान पण ही घाण कुठून आली तुमच्या जिल्ह्यात, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लगावला आहे. 

मनोज जरांगेंकडून भुजबळांचा एकेरी उल्लेख

मला म्हणतात सासरचे खातो, माझी सासरवाडी लांब. पण हाच सासरवाडीचे खातो. नगरच्या सभेत बघितलं का नुसता लाल झालाय तो. मंडल आयोगाचे नाव घेतलं की घाबरतो. त्याला पक्क माहितेय मंडल आयोग चॅलेंज होतय ते. मंडल कमिशन राज्याने स्वीकारले आहे का? केंद्राने हे फक्त त्यालाच माहिती आहे. न्यायालयाने स्वीकारले का नाही स्वीकारले हे पण त्यालाच माहीत, असा एकेरी उल्लेख भुजबळांना मनोज जरांगेंनी डिवचले आहे. 

मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी नांदगावात (Nandgaon) थांबलेल्या व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दादासाहेब पुंडलिक काळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होण्याआधीची ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी दवाखान्यात जावून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली, त्यांना धीर दिला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Related posts