[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nirbhay Bano Program Pune : निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, मविआ कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप
पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबंदात जात असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रम पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकंच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली.
[ad_2]