Pune News : | Pune News :

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune Traffic) चौकातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत (Traffic Diversion) बदल करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि मेट्रोच्या खांबांवर सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातील रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, गणेशखिंड रोड, औंध रोड आणि बाणेर रोड सारख्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पुणे शहर वाहतूक शाखेने 10 फेब्रुवारीपासून पुढील सूचना येईपर्यंत वाहतुकीतील बदल करण्यात आले आहेत. 

कोणता रस्ता सुरु, कोणता बंद?

औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडीहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करावा.

– एबीआयएल हाऊसमधून उजवीकडे वळा.

– सिम्फनी चौकमार्गे थेट साई चौक, खडकी आणि डॉ. आंबेडकर चौक, बोपोडी मार्गे जावे.

– ब्रेमेन चौकमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी स्पाइसर चौकमार्गे जावे

-औंध गावहून शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या वाहनानी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळावे.

– इच्छित स्थळी जाण्यासाठी थेट स्पाइसर चौक, डॉ. आंबेडकर चौक आणि साई चौक खडकी मार्गे जावे.

– रेंजहिल्सपासून एबीआयएल हाऊस चौकात उजवीकडे वळण्यास बंदी आहे.

-गणेशखिंड रोडवरील सांगण्णा धोत्रे मार्ग दुतर्फा आहे.

-गणेशखिंड रोडवरील खाऊ गल्ली ते ओम सुपर मार्केट सर्कल पर्यंत एकतर्फी वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून सिम्बायोसिस कॉलेज ते गणेशखिंड रोडपर्यंत खाऊ गल्लीतून गणेशखिंड रोडला प्रवेश बंदी आहे.

लक्झरी बस मार्ग आणि वेळ:

– संचेती हॉस्पिटल चौक, गणेशखिंड रोड, विद्यापीठ चौक, औंध ते पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसरात जाणाऱ्या लक्झरी बसेसना सकाळी 8 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही.

– गणेशखिंड रोडवरील उड्डाणपूल आणि मेट्रोचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पुणे शहरातून संचेती हॉस्पिटल चौकमार्गे गणेशखिंड रोडवर लक्झरी बसेसच्या प्रवेशावर बंदी राहील.

पर्यायी मार्ग कोणता?

वाहनधारकांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा वापर हॅरिस ब्रिजमार्गे पुणे शहरात करावा किंवा कात्रज – खादी मशीन चौकमार्गे बायपास रस्ता किंवा कात्रज मार्गे कात्रज मार्गे वर्दळीचा परिसर बायपास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

BJP workers Attack on Nikhil Wagle : निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, शाईफेक, अंडीफेक मात्र वाघळे कार्यक्रमस्थळी पोहचले अन् भाषण केलं, संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts