इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India Announced for England Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आतापर्यंत त्यापैकी दोन सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील एक सामना इंग्लंडनं, तर एक सामना टीम इंडियानं जिंकला आहे. आता पुढच्या तीन सामन्यांच्या निकालावर कसोटी मालिकेच्या विजयी संघाची घोषणा होणार आहे. अशातच गेल्या दोन सामन्यांत दिग्गज खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उर्वरित तीन सामन्यांत काहीसा दिलासा मिळणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण टीम इंडियाची रनमशीन असलेला दिग्गज विराट कोहलीनं मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमधूनही ब्रेक घेतला आहे. 

[ad_2]

Related posts