Youth suicide for Maratha Reservation GR In Parbhani Manoj Jarange fasting from today marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढला असून, याच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून केली जात आहे. एकीकडे मनोज जरांगे या मागणीसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असून, दुसरीकडे याच मागणीसाठी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या (Suicide) करत जीवन संपवलं आहे. परभणीच्या सेलु तालुक्यातील राजवाडी येथील प्रताप दिनकर शेवाळे या 27 वर्षीय मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. 

राजवाडी येथील प्रताप शेवाळे या मराठा तरुणाने आज सकाळीच शेतातील पळसाच्या झाडाला दोरीचा सहायाने गळफास घेवून आत्महत्या केलीय. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असुन, त्यात मराठा आरक्षणाचा सगेसोयरेचा कायदा होणे आवश्यक आहे, परंतु शासन हा कायदा परित करीत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर सेलु उपजिल्हा रूग्णालयात मराठा समाजाचा मोठा जमाव जमला आहे. सदर कुटुंबाला शासानाने 25 लाखांची तातडीची मदत दिली पाहिजे. सोबतच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी सकल मराठा समाजाचा बांधवानी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात सेलूचे तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी पोहचले आहेत. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 

सुसाईड नोट लिहून ठेवली…

माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगळे सोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन पारित करत नाही. त्या कारणाने मी आत्महत्या करीत आहे. मी प्रताप शेवाळे रा.राजवाडी …एक मराठा लाख मराठा

मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषण करणार 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. यासाठी मनोज जरांगे मागील चार महिन्यापासून सतत लढा देत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुंबई आंदोलनाच्या वेळी सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढला. त्यामुळे जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अजूनही या अध्यादेशाची अमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला असून, आजपासून ते आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले आमरण उपोषण आतापर्यंतचे सर्वात कठोर आमरण उपोषण असणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे एकीकडे मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मैदानात उतरले असतानाच, दुसरीकडे तरुण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

अधिक पाहा..

Related posts