[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
C- -390 Aircraft: ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा समूहाने ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेरच्या सहकार्याने C-390 मिलेनियम विमान तयार करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी हवाई दलाच्या गरजेनुसार ते तयार करण्याचे मान्य केले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत या कराराच्या संदर्भातील माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दलाला मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची (एमटीए) गरज भासत होती. त्यामुळं ऑटो क्षेत्रातील दिग्गज महिंद्रा समूहाने ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेरच्या सहकार्याने C 390 मिलेनियम विमान तयार करण्याची घोषणा केलीय. हवाई दल 18 ते 30 टन वजन उचलण्यास सक्षम MTA शोधत आहे. एम्ब्रेरने फेब्रुवारीमध्ये बंगळुरुमध्ये हे C-390 मिलेनियम मल्टी मिशन टॅक्टिकल एअर ट्रान्सपोर्ट प्रदर्शित केले होते. एम्ब्रेअर या विमानाबाबत महिंद्रा आणि टाटा समूहाशी चर्चा करत होते. पण, शुक्रवारी महिंद्राने पुढाकार घेत हा करार जाहीर केला. दोन्ही कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
आनंद महिंद्रा यांनी केली कराराची घोषणा
जगातील तिसरी सर्वात मोठी पॅसेंजर जेट उत्पादक एम्ब्रेर डिफेन्स अँड सिक्युरिटी आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स या करारावर एकत्र काम करतील. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या डीलमुळं खूप आनंद झाला आहे. त्याच्या मदतीने आम्ही भारतीय हवाई दलाच्या गरजा पूर्ण करू शकू. हवाई दल एमटीएसाठी लवकरच निविदा काढणार आहे. आमचा संयुक्त उपक्रमही यात सहभागी होणार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी सांगितलं.
टाटा समहूचा एअरबससोबत करार
अलीकडेच टाटा समूहाने H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी विमान उत्पादक कंपनी एअरबससोबत करार केला होता. करारानुसार, 40 C295 वाहतूक विमाने वडोदरा येथील असेंबली लाईनमध्ये तयार केली जातील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, येथे उत्पादित H125 हेलिकॉप्टर देखील निर्यात केले जातील. सध्या भारतात अशा 800 हेलिकॉप्टरची तात्काळ मागणी आहे. C-390 चा वापर ब्राझीलच्या हवाई दलाकडून केला जातो. यानंतर, पोर्तुगाल, हंगेरी, नेदरलँड, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने देखील ते खरेदी केले. एम्ब्रेरने यापूर्वी DRDO, BSF आणि भारत सरकारला विविध प्रकारची विमाने दिली आहेत.
आजपर्यंत बांधलेले हे सर्वात वजनदार विमान
एम्ब्रेर सी-390 मिलेनियम हे एक मध्यम आकाराचे, दुहेरी-इंजिन , जेट-शक्तीवर चालणारे लष्करी वाहतूक विमान आहे. हे विमान ब्राझिलियन एरोस्पेस उत्पादक एम्ब्रेरने डिझाइन आणि तयार केले आहे. कंपनीने आजपर्यंत बांधलेले हे सर्वात वजनदार विमान आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
[ad_2]