उद्धव ठाकरे संभाजीनगर, शिर्डी दौऱ्यावर असतानाच आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik News नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज सोमवारी (दि. 12) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. तर 13 आणि 14 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे संभाजीनगर, शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे 14 फेब्रुवारीला नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये ते आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) दौऱ्यांचे नियोजन केले जात आहे. 

दि.14 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरे कलानगर, वांद्रे येथून वाहनाने इगतपुरी, नाशिक येथे रवाना होतील. दुपारी 1 वाजता इगतपुरी येथे ते संवाद मेळावा घेणार आहेत. दुपारी 2.15 वाजता ते इगतपुरी येथून सिन्नरकडे मार्गस्थ होतील. 3.30 वाजता ते सिन्नर येथे संवाद मेळावा घेणार आहेत. सायंकाळी 4.15 वाजता सिन्नरहून आदित्य ठाकरे नाशिकला रवाना होतील. सायंकाळी 5 वाजता ते नाशिक शहरात संवाद मेळावा घेतील. 

ठाकरे गटाकडून विजय करंजकरांच्या नावाला शिक्कामोर्तब?

शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंनी नाशिकसाठी विजय करंजकर यांची हेच उमेदवार असतील, अशी घोषणा याआधी केली होती. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटातून करंजकर यांनी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक लोकसभेवर तीन पक्षांचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघावर याआधीच  काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु आहे. मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकारी नाशिकच्या जागेवर दावा ठोकत आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून नक्की कोणाला जागा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिकमध्ये ठाकरे गट-शरद पवार गटात जुंपली

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही पक्षांनी दावेदारी केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेचा उमेदवार नाशिकमधून निवडून येऊ शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. तर नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद आहे, असा दावा शिवसेना उबाठा गटाने करून शरद पवार गटावर पलटवार केला होता.

आणखी वाचा 

Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts