Rajya Sabha Election 2024 Maharashtra BJP’s mega plan for upcoming election to give clean sweep to MVA after joining Ashok Chavan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा  वेगाने घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) फुटल्यानंतर आता काँग्रेस मोठ्या प्रमाणावरती फुटताना पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनेक आमदार चव्हाणांसोबत भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र याचा परिणाम तोंडावर आलेल्या राज्यसभा निवडणुकीवर (Rajya Sabha) होताना पाहायला मिळतोय. राज्यसभेची एकही जागा महाविकास आघाडीला जिंकू न देण्याची मोठी रणनीती भाजपने आखलेली पाहायला मिळतेय.   

भाजपचा प्लॅन नेमका काय? (BJP Rajya Sabha plan)

 राज्यसभा असेल किंवा विधान परिषदेचं मतदान, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात. मागील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक मतदानावेळी शिवसेना फुटली. आताच्या राज्यसभा निवडणुकीच्य तोंडावर काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जर अशोक चव्हाण आपल्यासोबत अनेक आमदारांना घेऊन भाजपवासी झाले, तर एकही जागा महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही, असा भाजपचा प्लॅन आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक 

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे तीन, ठाकरे गटाचे एक अशा सहा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही व्ही मुरलीधरन हे खासदार निवृत्त होणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर  आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये समावेश आहे.

6 जागांसाठी मतांचं गणित काय?  

  • या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. 
  • महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं. 
  • त्यामुळे 286 भागिले 6 + 1 =
  • राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.86 इतका मतांचा कोटा  असेल.
  • भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.
  • एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकेल.
  • काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे.त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.
  • पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं..

महाविकास आघाडी म्हणून एकत्रित उमेदवार देण्यासाठी ही अडचण आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदाराला लागू शकतो. 
कारण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना (Shiv Sena MLA) लागू होईल.पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाचा हा निर्णय अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. निवडणुकीपर्यंत जर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अपात्रेबाबतचा निर्णय झाला. तर व्हीप (WHIP) कोणाचा हा मुद्दा राहणार नाही.

त्यामुळे आता भाजप 3 जागा शिवसेना 1 राष्ट्रवादी 1 अशा महायुतीच्या 5 जागा सहज येतील त्या सोबतच अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार आले तर 6 वी पण जागा कशी काढता येईल याचा विचार भाजप करत आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अशोक चव्हाण यांच आमदारांच शक्तीबळ महत्वाचं ठरणार आहे. 

देशातील  56 सदस्यांचा कार्यकाळ संपणार 

येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. 27 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. 

संबंधित बातम्या 

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश, 27 फेब्रुवारीला मतदान

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts