Retail Inflation Data inflation rate has declined in January 2024  marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Retail Inflation Data: देशातील जनतेसह केंद्र सरकारला महागाईतून (Inflation) मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) सुमारे 0.60 टक्के घसरण झाली आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई दर हा 5.10 टक्के राहिला आहे. तर डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 5.69 टक्क्यांवर होता. जो मागील चार महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला होता. जानेवारी महिन्यात हा आकडा 5.10 टक्क्यांवर आला आहे.

अन्नधान्य चलनवाढीचा दर किती?

सांख्यिकी मंत्रालयाने जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी पालेभाज्या आणि भाज्यांची महागाई चिंतेचे कारण आहे. पालेभाज्या आणि पालेभाज्यांचा भाव 25 टक्क्यांच्या वर तर डाळींचा भाव 20 टक्क्यांच्या जवळपास आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 8.30 टक्के आहे. जो डिसेंबर 2023 मध्ये 9.53 टक्के होता.

भाजीपाला आणि डाळींच्या महागाईतून अद्याप दिलासा नाही

डिसेंबर 2023 च्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये डाळींच्या महागाईत किंचित घट झाली आहे. जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर 19.54 टक्के होता, जो डिसेंबर 2023 मध्ये 20.73 टक्के होता. भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून, डिसेंबरमधील 27.64 टक्क्यांवरुन तो 27.03 टक्क्यांवर आला आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दरही कमी झाला आहे. डिसेंबरमध्ये 9.93 टक्के होता तो 7.83 टक्के आहे. डिसेंबरमध्ये महागाईचा दर 19.69 टक्क्यांवरून 16.36 टक्क्यांवर आला आहे. फळांच्या महागाईचा दरही कमी झाला असून तो 8.65 टक्के झाला आहे जो डिसेंबर 2023 मध्ये 11.14 टक्के होता.

महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे आरबीआयचे लक्ष्य

किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या आसपास खाली आली आहे. पण महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे आरबीआयचे (RBI) लक्ष्य आहे. त्यानंतर ईएमआयमधून महागाईपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी, RBI ने 2024 साठी पहिले आर्थिक धोरण जाहीर केले. आरबीआयच्या मते, 2024-25 मध्ये महागाई दर 4.5 टक्के असेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर अन्नधान्याच्या चलनवाढीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असणार आहे. जागतिक तणावामुळं केवळ पुरवठ्याच्या समस्याच नाहीत तर कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत. अशा स्थितीत महागाईच्या ईएमआयमधून दिलासा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान, सध्या किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी पालेभाज्या आणि भाज्यांची महागाई चिंतेचे कारण आहे.

महत्वाच्या बातम्या:

RBI कडून पतधोरण जाहीर, यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5 टक्क्यांच्या वर राहणार

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts