uddhav thackeray says Devendra Fadnavis who says Ashok Chavan is not a leader but a dealer, made a deal with him( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण लीडर नाहीत तर डीलर आहेत असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी डील केल्याची खोचक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमधील जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून सडकून टीका केली. फडणवीस यांची तुलना कोणत्याही प्राण्यांशी करणार नाही .कारण मी कोणत्याच प्राण्यांचा अवमान करणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

तर शहिदांचा अपमान नाही का? 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शहिदांचा अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजप घेणार आहात का? तसं तुम्ही केलं तर शहिदांचा अपमान नाही का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, तुम्ही अशोक चव्हाण यांना भाजपत घेऊन राज्यसभेवर पाठवलं तर तुम्ही शहिदांचा अपमान कराल. 

मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडला

उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांत पाच जणांना भारतरत्न जाहीर केलेल्या पीएम मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले की,  मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडला आहे. त्या त्या राज्यात दिलं, तर तिथली मत मिळतील. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला याचा अभिमान आहे, पण त्यांच्या आयोगाच्या शिफारशी का लागू करत नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. स्वामीनाथन शिफारशी लागू केल्यास आम्ही तुमचा सत्कार करू. 

आम्ही मोदींचे भक्त नाही, आम्ही शिवरायांचे भक्त आहोत

या शहराचे नाव मी संभाजीनगर केलं याचा मला अभिमान आहे. म्हणे मी बाळासाहेब यांचे विचार सोडले, बाळासाहेब कधीही म्हणाले नव्हते की मी भाजपा सोबत कायम राहू, आम्ही मोदींचे भक्त नाही, आम्ही शिवरायांचे भक्त आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला सुनावले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Related posts