Pune News Pune Traffic news Pune causes of traffic congestion PMPML Pune Metro( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे वाहतूक कोंडीत जगात (Pune News) सातव्या क्रमांकावर (Pune Traffic) आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलं आहे. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरलेय. पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलं आहे. पुण्यात वाहतूक कोंडी नेमकी का वाढते आहे? याची नेमकी कोणती कारणं आहेत आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत आहे? पाहूयात…

1 . सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव 

पुण्यात PMPML सार्वजनिक बससेवा  सुरु आहे. ही बस वेगवेगळ्या परिसरात प्रवाशांसाठी सेवा देते. कमी पैशात अनेक पुणेकर या बसने प्रवास करतात. मात्र  ही बससेवा पूर्णपणे कमकुवत असल्यानं लोक खाजगी वाहनांना पसंती देतात. 

2. रस्त्यांची कमी रुंदी 

पुण्यात रस्ते रुंदीकरण करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची गरज आहे. मात्र महापालिका त्यासाठी फक्त एकशे वीस कोटी रुपये देत आहे. त्यामुळं रस्ते अरुंद पडत आहेत. या सगळ्याचा परिणाम खाजगी वाहनं वाढण्यावर झाला आहे. पुण्यात 45 लाख खाजगी वाहनं आहेत त्यापैकी 34 लाख दुचाकी आहेत . 

3. नियोजनचा अभाव 

रस्त्याची उभारणी करताना महापालिका इतर यंत्रणा उदाहरणार्थ मेट्रो, स्मार्ट सिटी यांच्यासोबत को-ऑर्डिनेशन ठेवण्यात कमी पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. 

 

4. रोड आर्किटेक्चर पूर्णपणे अपयशी

पुण्यात रोड आर्किटेक्चर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळं अनेक उड्डाणपूल पडावे लागले. तर जे भुयारी मार्ग किंवा अंडरपास आहेत. ते पुन्हा सिग्नलला येऊन मिळत असल्याने तिथे पुन्हा वाहतूक कोंडी होताना दिसते. 

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त

 पुण्यात सध्या सगळ्यात परिसरात मोठी वाहतून कोंडी होताना दिसते. 10 किलोमीटर प्रवास करण्यासाठी साधारण 28 मिनिटं लागतात. त्यामुळे पुणेकरांना वेळ वाया जातो. शिवाय या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त आहे. अनेकांना ऑफिस जाण्यासाठी उशीर होतो तर अनेकांची महत्वाची कामं लांबतात. परिणामी वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची चिडचिड वाढत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

Related posts