IND Vs ENG Sarfaraz Khan Father Emotional On His Debut When Son Got Test Debut Cap India Vs England Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sarfaraz Khan Father Emotional on His Debut: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात तिसरा कसोटी सामना (3rd Test Cricket Match) खेळवण्यात येणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या राजकोट कसोटीत धडाकेबाज युवा फलंदाज सरफराज खानला (Sarfaraz Khan) पदार्पणची संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) खराब फॉर्ममुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं असून त्याच्याऐवजी संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, पूर्णपणे फिट नसल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. 25 वर्षीय सरफराजने देशांतर्गत पहिल्या श्रेणीतील क्रिकेटमध्ये 70 पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराज इंग्लंडच्या संघावर तुटून पडणार यात काहीच शंका नाही. 

अनिल कुंबळेनं दिली डेब्यू कॅप 

सरफराज खानला भारताचा माजी कर्णधार आणि महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेनं पदार्पणाची कसोटी कॅप दिली होती. सर्फराज टीम इंडियाकडून कसोटी सामना खेळणारा 311वा खेळाडू ठरला आहे. सरफराज खान मुंबईच्या संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी सरफराजला डेब्यू कॅप देण्यात आली, त्यावेळी त्याचे वडील नौशाद खान मैदानातच उपस्थित होते. तो क्षण पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी सरफराजला कडकडून मिठी मारली. सरफराज आपल्या वडिलांच्या पठडीत तयार झाला आहे. सरफराजला देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतच्या प्रवासासाठी प्रशिक्षण त्याचे वडील नौशाद खान यांनी दिलं आहे. 

वडिलांना अश्रू अनावर 

माजी कर्णधार सरफराज खान जेव्हा पदार्पणाची कॅप घेत होता, त्यावेळी त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफच्या एका सदस्यानंही वडिलांना मिठी मारली. सरफराज खाननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 71 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याचा संघात समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. सरफराजला मिळालेली डेब्यू कॅप त्यांनी हातात घेतली आणि तिचं चुंबन घेतलं. 

आजच्या सामन्यात सरफराज, ध्रुवचं पदार्पण 

टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्लेईंग इलेव्हन ठरवणं रोहितसमोर मोठं आव्हान होतं. आजच्या सामन्यासाठी संघात सरफराज खानला संधी मिळाली आहे. सरफराजसाठी आजचा कसोटी सामना पदार्पणाचा सामना आहे. तसेच, विकेटकिपर केएस भरत तसा फारसा फॉर्मात नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. ध्रुवसाठीही आजचा सामना पदार्पणाचा सामना आहे. म्हणजेच, आजच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघात दोन नवख्या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजानंगी दुखापतीनंतर संघात कमबॅक केलं आहे. 

राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राजकोट कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11

जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स एंडरसन. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Team India Playing-11: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारताची Playing 11; दोघांचं पदार्पण, दोघेही विकेटकीपर!



[ad_2]

Related posts