Virat Kohli Completes 2000 Runs Against Australia In Test Cricket With Single Four ; विराट कोहलीने चौकारासह रचला मोठा विक्रम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : विराट कोहली पहिल्या डावात लवकर बाद झाला खरा, पण संघाला गरज असताना दुसऱ्या डावात मात्र आता त्याने दमदार फलंदाजी केली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने चौकार लगावला आणि एक मोठा विक्रम आता त्याने आपल्या नावावर केला आहे.शुभमन गिल आणि त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला व कोहलीची मैदानात एंट्री झाली. कोहली मैदानात येताच फक्त सहा चेंडूंमध्येच चेतेश्वर पुजाराही बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था बिकट होती. पण कोहलीने यावेळी भारताचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांना विजयाच्या उंबठ्यावर येऊन उभे केले आहे. पण हे करत असताना कोहलीने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे.

भारताचाडाव डगमगायला लागला होता. पण कोहली मात्र आपल्या आक्रमक शैलीत खेळत राहीला. कोहलीने यावेळी चौकाल लगावत संघावरील दडपण दूर केले आणि त्याचबरोबर एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कोहलीने जेव्हा पहिला चौकार लगावला तेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०० धावांचचा पल्ला ओलांडणारा कोहली आता पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चौकार लगावला आणि तो आता सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडसारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा या सचिनच्या नावावर आहे. या क्लबमध्ये सचिन, द्रविड,व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश होता आणि आता यामध्ये कोहली दाखल झाला आहे. पुजाराच्या नावावर २०७४ धावा आहेत. त्यामुळे जर या सामन्यात कोहलीने शतक झळकावले तर तो पुजाराच्या पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आता कोहली या सामन्याच्या पाचव्या दिवशी शतक झळकावणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

कोहलीने जर पुजारा मागे टाकले तर तो या सध्याच्या संघातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.

[ad_2]

Related posts