Rajya Sabha Election Nominations BJP Shiv Sena NCP Congress Milind Deora Ashok Chavan medha Kulkarni maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Election Nominations : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आज महायुतीच्या (Mahayuti) सर्व उमेदवारांनी (Camdidate) अर्ज दाखल (Nomination Form) केले आहेत. काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करत नुकतेच भाजप (BJP) पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपच्या तीन उमेदवारांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि अजित गोपछडे (Ajit Gopichade) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज भाजपच्या तीन राज्यसभा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी विधीमंडळात दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महायुतीतील सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महायुतीतील सर्व उमेदवारांकडून अर्ज दाखल

भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वरिष्ठांचे आभार मानले. ‘हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पक्षासाठी एवढे वर्ष दिले, त्याचं हे पळ आहे. मला जेव्हा आमदारकीची उमेदवारी नाकारण्यात आली होती तेव्हा काही समाज लोक नाराज झाले होते मात्र आज ही नाराजगी दूर झाली आहे. माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मी केंद्रीय मंत्री सगळ्या नेत्यांचे आभार मानते.’ अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. यासोबत स्त्रियांचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

शिवसेना शिंदे गटाकडून आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिली, यामुळे शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

प्रफुल्ल पटेलांनीही भरला फॉर्म

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी आज राज्यसभेसाठी फॉर्म भरला आहे. मी या आधी देखील राज्यसभेवर होतो. राजकीय जीवनात असताना काही ना काही घडामोडी करावीच लागते. हा फॉर्म मी का भरलेला आहे, हे येणारा काळ स्पष्ट करेल. रिक्त झालेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असंही प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts