NCP MP Supriya Sule slam devendra fadanvis bjp and ajit pawar in mumbai marathi news update | फडणवीस म्हणतात आरोग्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, भुजबळांचेही ऐकून घेतलं जात नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya Sule : महाराष्ट्रच्या आरोग्यमंत्र्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) म्हणाले होते. छगन भुजबळ यांचं देखील कॅबिनेटमध्ये ऐकून घेतलं जातं नाही. त्यामुळे त्यांना मीडियात म्हणून त्यांना बोलावं लागतं. ते मागच्या आठवड्यात मला भेटले, त्यावेळी सांगत हो काय काय होतं आहे. मला आता सगळं सांगायचं नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या मुंबईत बोलत होत्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं.  

जो संघर्ष करेल तोच मैदान जिंकेल – 

पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं आहे.आपण कोर्टात गेलो आहोत. आता रडण्याचे दिवस गेले, आता लढण्याचे दिवस आले आहेत. माझ्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. प्रेमाची नाती जपायची असतात, ती तोडायचे नसतात, पण मला असं वाटतं नाही. हा संघर्षाचा काळ आहे, कारण मैदान सगळ्यांसाठी खुले आहे. जो संघर्ष करेल तोच मैदान जिंकेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपण आपला पक्ष आणि विचार लोकांपर्यंत पोहचवायचा आहे, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

भाजपवर गंभीर आरोप – 

आज सकाळी इलेक्ट्रोल बाँडची परवानगी होती. 8 वर्षांपूर्वी आम्ही याला विरोध केला होता. भाजप आम्हाला याबाबत विरोध करत होते, मात्र आता सुप्रीम कोर्टाने हा विषय थांबवला आहे. सगळ्यात जास्त 5 हजार कोटी रुपयांचे इलेक्त्ट्रोल बाँड भाजपकडे आहेत, कोर्टाने याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. भाजपला मला सवाल करायचा आहे की भाजप कडून जिथं धाड मारली जाते तिथं इतक्या नोटा येतात कुठून? डिजिटल पेमेंट सिस्टीम यांनी आणलं. 27 हजार कोटी रुपये भ्रष्टाचार पेटीएममध्ये झाला आहे. यात सर्वात मोठी गुंतवणूक चायनाची आहे. एकीकडे त्यांच्यासोबत तूम्ही संघर्ष करता आणि दूसरीकडे हा व्यवहार झालाच कसा काय? असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. 

अबकी बार गोळीबार सरकार –

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती हे राज्य चालवते. मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पोलीस ठाण्यात बंदुकीतून गोळीबार केला जातोय, आपल्याला आरआर आबा यांच्यासारखा गृहमंत्री हवा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असलेलं राज्य हवं आहे. सध्या अबकी बार गोळीबार सरकार अशी स्थिती आहे. 
मागचा काळात व्हाईट पेपर सरकारने काढला होता. त्यामध्ये एक विषय होता. ज्यांच्या बाबत हा विषय होता तो थेट सत्ताधारी पक्षात सहभागी झाला आहे. यांचा आदर्श नेमका काय घ्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

लेकी ह्या लढणाऱ्या असतात मागे हटणाऱ्या नाही – 

मला आयुष्यात दोन ऑप्शन होते, एका बाजूला संघर्ष,वडील तर दूसरीकडे सत्ता हा पर्याय होता. मी संघर्ष हा पर्याय निवडला आहे. नवीन पक्ष काढू नवीन चिन्ह घेऊ पण ओरबाडून काही घ्यायच नाही. पंकजा मुंडे सातत्यानं संघर्ष करत आहेत, मात्र त्या जागेवरून हटल्या नाहीत. लेकी ह्या लढणाऱ्या असतात मागे हटणाऱ्या नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts