Manoj Jarange Patils demand for Maratha Reservation is unconstitutional says Parinay Fuke

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gondia News गोंदिया : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. यावर भाजपाचे(BJP) नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके (Parinay Fuke) यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या या असंवैधानिक असल्याचे भाष्य केले आहे. जरांगे पाटील यांनी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्या मागायला पाहिजे. कोणतेही सरकार असं सरसकट आरक्षण देऊ शकत नसल्याचे देखील परिणय फुके म्हणाले. तर उपोषण करून मनोज जरांगे पाटील हे सरकारला दबावात आणण्याचा काम करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्या या संविधानानुसार नसल्याचे मत भाजपाचे नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी बोलतांना व्यक्त केले आहे. 

जरांगे पाटील यांच्या मागण्या असंवैधानिक

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील (Jalana) अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज सकाळपासून त्यांच्या पोटात प्रचंड दुखत होते. दुपारच्या सुमारास अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने मनोज जरांगे यांना पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही पिणेही शक्य नाही. त्यामुळे अंतरवाली सराटीत जमलेले मराठा आंदोलकांच्या मनात चलबिचल सुरु आहे. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली असून राज्यभरात त्यांच्या प्रकृतीला घेऊन चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या या असंवैधानिक असल्याचे भाष्य केले आहे. यावर आता मराठा आंदोलक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा कुठलाही विरोध नाही. पक्षाची भूमिका ही वेगळी असू शकते, त्यावर वारिष्ठ बोलतील, मात्र मला व्यक्तिगत विचारले तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसार कोणतेही सरकार सरसकट मराठा आरक्षण देऊ शकत नाही. जरांगे पाटील यांना विनंती आहे की त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा. आरक्षणाचा अभ्यास करावा आणि त्यानंतर मग आपल्या मागण्या सरकारकडे केल्या पाहिजेत. कारण दरवेळी ते उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे देखील परिणय फुके म्हणाले. 

काँग्रेसवर नागरिकांचा विश्वास राहिला नाही

काँग्रेस पक्षातून नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर भाजप नेते परिणय फुके यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास राहिला नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांचं नेतृत्व नाकारला असल्याची टीका करत आगामी काळात आणखी 16  ते 17 आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts