IND vs AUS WTC Final 2023 LIVE: भारतीय संघ ऑल आऊट होण्याच्या मार्गावर, यंदाही ICC ट्रॉफीचं स्वप्न भंगणार – wtc final 2023 ind vs aus day 5 live score updates icc world test championship india vs australia match today oval cricket ground london

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता शेवटच्या दिवसाकडे येऊन पोहोचला आहे. आज ११ जूनला या सामन्याचा अंतिम दिवस असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन संघ आज जगाला मिळणार आहे. पण तत्पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आपली निकराची लढाई लढत आहे. भारताला विजयासाठी आज २८० धावांची गरज आहे. पाचव्या दिवसाचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट

> उमेश यादव झेलबाद
स्टार्कच्या ६१व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उमेश यादव कॅरीकडून झेलबाद झाला. त्याला केवळ १ धाव करता आली.

> शार्दुल ठाकूरही बाद
नॅथन लायनच्या ५८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूर खाते न उघडता LBW आऊट.

> अजिंक्य राहणे झेलबाद
स्टार्कच्या ५७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहाणे कॅरीकडून झेलबाद झाला. रहाणेने १०८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या.

> भारताने गाठला २०० धावांचा पल्ला
स्टार्कच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने चौकार लगावत भारताला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. भारताला विजयासाठी अजून २५४ धावांची गरज

> सलग दुसरा धक्का
बोलँडच्या ४७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जडेजा खाते न उघडताच झेलबाद

> विराट कोहली बाद
बोलँडच्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने विराट कोहलीला झेलबाद केले. विराट कोहलीचे अर्धशतक १ धावेने हुकले. त्याने ७८ चेंडूत ७ चौकारांमध्ये ४९ धावा केल्या.

> भारताच्या डावाला सुरूवात

> विराटला नेमकं सांगायचंय तरी काय? WTC फायनलच्या पाचव्या दिवसापूर्वी शेअर केली विचित्र पोस्ट

विराटला नेमकं सांगायचंय तरी काय? WTC फायनलच्या पाचव्या दिवसापूर्वी शेअर केली विचित्र पोस्ट
> भारताला पाचव्या दिवशी इतिहासत रचण्याची संधी, आतापर्यंत एकाही देशाला ही गोष्ट जमली नाही…

भारताला WTC Final मध्ये इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत एकाही देशाला ही गोष्ट जमली नाही…
> WTC फायनल रिजर्व डे ला खेळवावी लागणार? लंडनमध्ये पाचव्या दिवशी पावसाची ९९ टक्के शक्यता

WTC फायनल रिजर्व डे ला खेळवावी लागणार? लंडनमध्ये पाचव्या दिवशी पावसाची ९९ टक्के शक्यता
> कॅमेरून ग्रीनलाही शुभमनच्या त्या कॅचबद्दल होती शंका? म्हणाला- मला वाटलं मी….

WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनलाही शुभमनच्या त्या कॅचबद्दल होती शंका? म्हणाला- मला वाटलं मी….

> चौथ्या दिवसाचा लेखाजोखा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४४४ धावांवर आपला डाव घोषित केला आणि भारताला १३७ षटकांमध्ये विजयासाठी ४४४ धावांचे तगडे आव्हान दिले. याच्या प्रत्युत्तरात भारताने चांगली सुरुवात केली. पण शुभमन गिलला १८ धावांवर कॅमेरून ग्रीनने टिपलेल्या विवादित झेलमुळे बाद घोषित करण्यात आले. तर रोहित शर्मा पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नांत ४३ धावांवर बाद झाला. तर त्याच्यापाठोपाठ पुजारा २७ धाव करत झेलबाद झाला. त्यांनतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने भारताचा डाव सांभाळत ५० अधिक धावांची भागीदारी करत भारताचा डाव उचलून धरला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३ बाद १६४ धावा केल्या. तर भारताला आता विजयासाठी २८० धावांची आवश्यकता आहे.

[ad_2]

Related posts