Maharashtra News Ahmednagar News BJP On Borrowed Agricultural Produce Market Committee, Defeat To Rohit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Karjat APMC Election : राजकारणात कोण कधी पलटी मारेल, कोणाची सत्ता कधी येईल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्यय कर्जतवासियांना आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चुरशीची निवडणूक म्हणून पाहत आलेल्या, त्याचबरोबर अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. अशा कर्जत कृषी उत्पन्न बाजार (Karjat Bajar Samiti) समितीवर भाजपने झेंडा रोवला असून रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. 

काही दिवसापूर्वी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC election) रणधुमाळी पार पडली. अनेक बाजार समिती निवडणुकांचे निकाल अनपेक्षित होते. अशातच सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर 9Bajar Samiti Election) भाजपने कमळ फुलवले आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झाला. भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवारांनी (Rohit Pawar) ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

दरम्यान कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काय लागतो? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde) यांच्यात चांगलीच चुरस लागलेली दिसून येत होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांना 9-9 अशा समसमान जागा निवडून आल्या होत्या. यात राम शिंदे यांच्या गटातील दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मतमोजणीत कोणताही बदल झाला नाही. आज सभापती उपसभापती यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

असा पडला मतांचा आकडा 

यात सभापती पदासाठी भाजपच्या काकासाहेब तापकीर यांना 9 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या गुलाब तनपुरे यांना 8 मते मिळाली. राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याने काकासाहेब तापकीर यांचा विजय झाला. तर उपसभापती पदासाठी भाजपच्या अभय पाटील यांना 10 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या अक्षय शेवाळे यांना 8 मते मिळाली आणि उपसभापती पदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झाला. उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मतं फुटले आहे. अखेर राम शिंदे यांनी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय खेळी करत रोहित पवार यांना धक्का दिला आहे. 

निवडणुकीत काय घडलं? 

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी 9 जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित 9 जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. दोन्ही गटांचे समसमान उमेदवार निवडून आले. त्यामुळे ‘ईश्वर चिठ्ठी’ने सभापती आणि उपसभापती ठरवला जाणार होता. मात्र शेवटी भाजपच्या बाजूने चिठ्ठीचा कौल गेल्याने कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. 

[ad_2]

Related posts