Mumbai School Bus owners warning for amid school time change

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai School Bus : प्राथमिक शाळेची वेळ बदलणार, स्कूल बस चालक-मालकांकडून भाडं वाढवण्याचा इशारा

प्राथमिक शाळा सकाळी ९ वाजल्यानतंर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध केलाय. शिक्षण विभागानं चर्चा न करता निर्णय घेतल्यानं स्कूलबस मालकांनी विरोध केलाय. निर्णयावर फेरविचार न केल्यास स्कूलबसचे भाडं २५-४० टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी राज्य सरकारला दिलाय. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाही. शिवाय मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवरमध्ये स्कूलबसला एकूण आठ फेऱ्या माराव्या  लागणार आहेत. गर्दीत विद्यार्थ्यांना ने-आण करणे हे अधिक अडचणीचे होणार असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे.

[ad_2]

Related posts