Ind Vs Eng Sarfaraz Khan And Anil Kumble Strange Connection After Debut Test Run Out Team India Vs England Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anil Kumble and Sarfaraz Khan: राजकोटमध्ये (Rajkot Test) इंग्लंडविरोधात (IND vs ENG) स्टार युवा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) यानं धमाकेदार डेब्यू केला. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सरफराजनं आपली छाप सोडली. आपल्या पहिल्या वहिल्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना सरफराज पुरून उरला. सरफराज एखाद्या वादळाप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. सरफराजला खेळताना पाहून क्रिकेट चाहतेही आवाक् झालेले. पण, सर्वाचा हिरमोड झाला तो, सरफराज आऊट झाला तेव्हा. रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) चुकीच्या कॉलमुळे नॉन-स्ट्रायकरच्या एंडजवळ सरफराज आऊट झाला. पण असं असलं तरीदेखील सरफराजनं भारतीय क्रिकेट संघातील (India National Cricket Team) माजी दिग्गज क्रिकेटपटूची बरोबरी केली आहे.  

सरफराजनं अनिल कुंबळेच्या नको असलेल्या विक्रमाशी बरोबरी केली

रवींद्र जाडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज रनआऊट झाला, त्यावेळी त्यांनं टीम इंडियाचा स्टार स्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची बरोबरी केली आहे. खरंतर, सरफराजच्या आधी अनिल कुंबळेंनी इंग्लंडच्या विरोधात 9 ऑगस्च 1990 रोजी मॅनचेस्टरमध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. सरफराजप्रमाणेच कुंबळे आपल्या पहिल्या टेस्टच्या पहिला डावात रनआऊट झाले होते. 

अनिल कुंबळेंप्रमाणेच सरफराजही इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात धावबाद झाला होता. मात्र, सरफराजसाठी त्याचं पदार्पण कुंबळेंच्या फलंदाजीपेक्षा खूपच खास होतं. त्यानं 66 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 62 धावा केल्या.

अनिल कुंबळेंनी दिली सर्फराजला डेब्यू कॅप 

राजकोट कसोटीत सरफराज खानला भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेंनी डेब्यू कॅप दिली होती. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध पदार्पणाची कसोटी कॅप घेऊन कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करणं हा एक रंजक योगायोग आहे. सरफराजला सामन्याच्या दुसऱ्या डावात धावबाद विसरून टीम इंडियासाठी मोठी खेळी खेळायचा प्रयत्न करेल. 

India Vs England : राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

3rd Test India Vs England : राजकोट कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11

जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स एंडरसन. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

एका लेकाने Under19 वर्ल्डकप गाजवला, आज दुसरा लेक टीम इंडियाकडून कसोटीच्या मैदानात, बापाच्या डोळ्यात घळाघळा पाणी!

[ad_2]

Related posts