Only One Reason Of India’s Defeat Against Australia In WTC Final 2023 ; भारताने फक्त एका गोष्टीमुळे गमावला फायनलचा सामना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : भारताला विश्व अजिंक्ययपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. पण भारताचा हा पराभव फक्त एकाच गोष्टीमुळे झाला, असे स्पष्ट मत माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. या पराभवानंतर गांगुली यांनी भारताच्या पराभवाचे चांगलेच पोस्टमॉर्टम केले आहे.भारतीय संघाला पहिल्या दोन दिवसांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. पण भारताने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी दमदार कामगिरी केली. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगला होता. भारताला हा सामना जिंकण्याची संधीही निर्माण झाली होती. कारण भारताला हा सामना जिंकण्यासाठी अखएरच्या दिवशी २८० धावांची गरज होती आणि त्यांच्या हातामध्ये सात विकेट्स होत्या. पण पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताने आपल्या सातही विकेट्स गमावल्या आणि त्यांना पराबव पत्करावा लागला. पण यावेळी भारताचा हा पराभव कोणत्या एका कारणामुळे झाला, हे गांगुलीने स्पष्ट केले आहे.

सामना संपल्यावर गांगुली यांनी सांगितले की, ” गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिले तर भारताला मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवता आलेले नाहीत. भारतीय संघ साखळी फेरीत चांगली कामगिरी करतो, पण त्यांना अंतिम फेरीत मात्र चंगली कामगिरी करता आलेली नाही. या सर्व पराभवांचे एकच कारण आहे आणि ते कारण आहे फलंदाजी. कारण जेव्हा तुम्हाला सामना जिंकायचा असतो तेव्हा तुम्हाला धावा रचायच्या असतात. जेव्हा तुमच्याकडे जास्त धावा असतात तेव्हा गोलंदाजांना विजय मिळवून देण्यासाठी सबळ कारण असते. पण जेव्हा तुमच्याकडे जास्त धावा नसतील तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही आणि हेच आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. गेल्या बऱ्याच बाद फेरीतील सामन्यांमध्ये भारताचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भारताला फायनल आतापर्यंत जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे फलंदाजी हेच एकमेव भारताच्या पराभवांचे कारण ठरले आहे.”

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारतीय संघ पुन्हा एकदा पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले आणि या सामन्यात पुन्हा भारताचे फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.

[ad_2]

Related posts